Headlines

मतदारांच्या महिलांना मंगळसूत्राची धमक्या देऊन जिल्हा बँक घेतली ताब्यात

खा विनायक राऊत वाढदिवस कार्यक्रमात सतीश सावंत यांचा आरोप सावंतवाडी ता.१५-:* जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मतदारांच्या महिलांना मंगळसूत्रांची भीती दाखवून तुमच्या असलेल्या गळ्यातील मंगळसूत्र सुरक्षित पाहिजे असेल तर सतीश सावंत यांनी मतदान करू नका अशा प्रकारच्या धमक्या देऊन त्यांनी विजय मिळवला आहे असा आरोप माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी खासदार विनायक राऊत…

Read More

खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

सावंतवाडी ता.१५-:* रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार श्री विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी तळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार श्री. राऊत यांचा वाढदिवस आज जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्सवात साजरा होत आहे.

Read More

विद्यार्थ्यांनी घेतला विक्रेत्याचा अनुभव

वेंगुर्ला ता.१५-:* नेहमी पालकांसोबत ग्राहक म्हणून खरेदी करण्याचा अनुभव घेणा-या लहान मुलांनी विविध खाद्यपदार्थांची दुकाने मांडत आपण स्वतःच विक्रेते झाले. मार्केटींगचा कोणताही अनुभव नसताना आपल्या वस्तूंची विक्री करतानाचा एक वेगळाचा आनंद लहान मुलांच्या चेह-यावर दिसत होता. वेंगुर्ला येथील श्री शिवाजी प्रागतिक शाळेमध्ये १४ मार्च रोजी बाल आनंद मेळावा घेण्यात आला. लहान वयातच मुलांना व्यवहार ज्ञान…

Read More

ओसरगाव येथे काजू आंबा बागेला आग

बागायतदार शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कणकवली ता.१५-:* एकीकडे अंगाची लाही करणाऱ्या उन्हाच्या झळा बसू लागल्या असतानाच दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथील हॉटेल शर्मिला नजीक काजू आंबा बागायतीला अचानक लागलेल्या आगीमुळे बागायतदार शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. ओसरगाव येथे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आग लागली. नॅशनल हायवेलगतच्या काजू, आंबा बागायतीस लागलेली आग लक्षात…

Read More

निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी आतापासून कामाला लागा

रुपेश राऊळ; खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस केक कापुन साजरा: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार सावंतवाडी ता.१५-:* जिल्ह्यात पार पडलेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपल्याला चांगले यश मिळत असून, आगामी काळात देखील होणाऱ्या नगरपरिषद,जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी आतापासूनच आपल्याला कामाला लागले पाहिजे. असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी खासदार विनायक राऊत…

Read More

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग बाजारपेठ फुलली…

विविध रंगांसह, मुखवटे, पिचकाऱ्या बाजारात दाखल… दोडामार्ग,दि.१५.-:* कोकणात जसा गणेश चतुर्थी सण महत्त्वाचा मानला जातो तसाच कोकणातील अनेक गावात पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा शिमगोत्सव धुम आता सुरू झाली आहे.दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात गेल्या दोन वर्षांत कोरोनाचे संकट लक्षात घेऊन काही निर्बंध घातले गेले होते त्यामुळे शिमगोत्सव धुमधडाक्यात साजरा करता आला नव्हता पण यावेळी कोरोनाचे संकट…

Read More

नांदगावात गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

मुले आणि गायन यांचे अतुट नाते : सचिन हुंदळेकर कणकवली ता१५-:* नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विदयमाने जिल्हास्तरीय देश भक्ती व भक्ती गीत भाव गीत यावर ऑनलाईल गीत गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण होत आहे. या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली खुप आनंद वाटला लहान मुलं आणि गायन हे अतुट नाते असल्याचे प्रतिपादन कणकवली…

Read More

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षा

कणकवली ता.१५-:* अखिल भारतीय महाराष्ट्र् राज्य प्राथमिक शिक्षक संघ कणकवली यांच्यावतीने खारेपाटण व शेर्पे केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या इयत्ता ५ वी च्या विद्यर्थ्यांकरिता शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे करण्यात आले होते. या सराव परीक्षेचे उदघाटन जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व शिक्षण तज्ञ…

Read More

शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी मळगाव येथे मोफत बस सेवा उपलब्ध

राजू परब मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम सावंतवाडी ता.१५-:* मळगाव येथील राजू परब मित्रमंडळ यांच्यावतीने व मळगाव ग्रामपंचायत सदस्या निकिता राऊळ, निलेश राऊळ, मळगाव ग्रामपंचायत माजी सरपंच निलेश कुडव, दीपक जोशी यांच्या सौजन्याने मळेवाड, न्हावेली, निरवडे-कोनापाल येथून मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे शालांत परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्तुत्य…

Read More

निलेश राणेंच्या वाढदिनी शुभेच्छांचे बॅनरनी जिल्हा केला हायजॅक

युवानेते विशाल परब यांच्या नावाची जिल्ह्यात चर्चा;भव्य कबड्डी स्पर्धेचे केले आहे आयोजन सावंतवाडी ता.१५-: माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते विशाल परब मित्र मंडळ व भारतीय जनता पार्टी कुडाळ यांच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी विशाल परब यांनी कुडाळ मध्ये जोरदार तयारी सुरू करत, ठिकठिकाणी बॅनर लावून संपूर्ण…

Read More
You cannot copy content of this page