शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी मळगाव येथे मोफत बस सेवा उपलब्ध

राजू परब मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम

सावंतवाडी ता.१५-:* मळगाव येथील राजू परब मित्रमंडळ यांच्यावतीने व मळगाव ग्रामपंचायत सदस्या निकिता राऊळ, निलेश राऊळ, मळगाव ग्रामपंचायत माजी सरपंच निलेश कुडव, दीपक जोशी यांच्या सौजन्याने मळेवाड, न्हावेली, निरवडे-कोनापाल येथून मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे शालांत परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या स्तुत्य उपक्रमाचे मळगाव ग्रामस्वच्छता कमिटी अध्यक्ष गुरुनाथ गावकर, समाजिक कार्यकरते गजानन सातार्डेकर यांनी अभिनंदन केले

You cannot copy content of this page