खारेपाटण केंद्र शाळा नं.१ येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षा

कणकवली ता.१५-:* अखिल भारतीय महाराष्ट्र् राज्य प्राथमिक शिक्षक संघ कणकवली यांच्यावतीने खारेपाटण व शेर्पे केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या इयत्ता ५ वी च्या विद्यर्थ्यांकरिता शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे करण्यात आले होते. या सराव परीक्षेचे उदघाटन जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व शिक्षण तज्ञ संतोष पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला केंद्र प्रमुख सद्गुरू कुबल,खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर, रामा पांचाळ,अनिल पांचाळ,योगेश शिंदे,सतीश कर्ले,सौ नंदिनी पराडकर,संपदा राऊत, शमीन सोलकर,पूजा वाघरे, शिवाजी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

शिष्यवृत्ती सराव परीक्षा केंद्र संचालक व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकर्ते प्रवीण कासार यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.खारेपाटण व शेर्पे केंद्रातील एकूण ५ शाळांचे मिळून २७ विद्यार्थी या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत सहभाग घेतला होता. ” शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या माध्यमातून विदयार्थी भविष्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी सज्ज व तयार होत असतो. त्यामुळे इयत्ता ५ वी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली सराव परीक्षा गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रेरणादायक आहे.” असे उदगार जि प केंद्र शाळा खारेपाटण नं.१ चे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी काढले.

सदर शिष्यवृत्ती सराव परिक्षे करिता अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ कणकवली या शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते गोरख गायकवाड, श्रीपाद बागडी,सखाराम खरात, अमोल तुपविहिरे,सुनील खांडेकर, श्रीम अलका मोरे,रेखा लांघी,सुचिता पावरा,श्री अमोल भंडारी आदी शिक्षक वृदानी सहकार्य केले. यावेळी केंद्र प्रमुख सद्गुरू कुबल यांनी देखील यावेळी मसर्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल खोत यांनी केले.तर आभार प्रवीण कासार यांनी केले.

You cannot copy content of this page