नांदगावात गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

मुले आणि गायन यांचे अतुट नाते : सचिन हुंदळेकर

कणकवली ता१५-:* नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विदयमाने जिल्हास्तरीय देश भक्ती व भक्ती गीत भाव गीत यावर ऑनलाईल गीत गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण होत आहे. या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली खुप आनंद वाटला लहान मुलं आणि गायन हे अतुट नाते असल्याचे प्रतिपादन कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी नांदगाव येथील गायन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभा वेळी केले . हुंदळेकर बोलताना पुढे म्हणाले की, यात अनुक्रमे तिनं यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आली .त्याच बरोबर ज्या 46 स्पर्धकांनी सहभाग घेतला त्या सर्वांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . याबद्दल आयोजक ऋषिकेश मोरजकर यांचे विशेष अभिनंदन करतोय .कारण काही ठिकाणी तर अनुक्रमे तिनं यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात येतात .पण येथे असे न करता सर्वाना पारितोषिक देण्यात आली.

गायन स्पर्धा लहान गट :- प्रथम क्रमांक – कु. सलोनी सुरेंद्र शेलार ,जि.प.पूर्ण प्राथमीक शाळा ओटव नांदगाव व्ह्यु :- 1 हजार 400 ,लाईक – 387 ,व्दीतीय क्रमांक :- फैजान इक्बाल नावळेकर इयत्ता पाचवी सरस्वती हाय.नांदगाव व्ह्यु:- 1 हजार, लाईक :- 339 ,तृतीय क्रमांक :- कु.ओमकार ऋषिकेश मोरजकर इयत्ता 1 ली केंद्र शाळा नांदगाव नं.1 -व्ह्यू:- 925 लाईक :- 225 तर उत्तेजनार्थ – प्रांजल दीपक मोरजकर , इयत्ता 2 री केंद्र शाळा नांदगाव नं.1 :- 636 लाईक :- 204 मोठा गट प्रथम क्रमांक :- रेहान इक्बाल नावळेकर इयत्ता दहावी सरस्वती हाय.नांदगाव व्ह्यु – 957 लाईक -346, व्दीतीय क्रमांक :- ओमकार प्रमोद परब श्री सरस्वती इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी तोंडवली -व्ह्यु – 1 हजार 200 लाईक- 226 ,तृतीय क्रमांक :- श्रुती हनुमंत म्हसकर इयत्ता आठवी सरस्वती हाय.नांदगाव व्ह्यु -928 लाईक – 178 तर उत्तेजनार्थ :- आर्या कृष्णा म्हसकर इयत्ता नववी सरस्वती हाय.नांदगाव व्ह्यू -660 लाईक -110 या विदयार्थ्यांनी सुयश संपादन केले .याचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे.

यावेळी व्यासपीठावर पं.स.सदस्या सौ हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर,उपसरपंच निरज मोरये, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर ,राजन मोरजकर ,विजय मोरये, ग्रामपंचायत सदस्य मजिद बटवाले,सौ .वळंजू , ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर,वारगाव हायस्कूल मुख्याध्यापक हनुमंत वाळके , ग्रामपंचायत सदस्या सौ वृषाली मोरजकर, रविराज मोरजकर, कमलेश पाटील, हेमंत पाटील,जानवी म्हसकर,मयुरी मोरये, मारूती मोरये , आनंद तांबे सर आदी उपस्थित होते. कार्यक्रम सुत्रसंचालन राजेश कदम यांनी तर प्रास्ताविक ऋषिकेश मोरजकर व आभार उपसरपंच निरज मोरये यांनी मानले.

You cannot copy content of this page