शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग बाजारपेठ फुलली…

विविध रंगांसह, मुखवटे, पिचकाऱ्या बाजारात दाखल…

दोडामार्ग,दि.१५.-:* कोकणात जसा गणेश चतुर्थी सण महत्त्वाचा मानला जातो तसाच कोकणातील अनेक गावात पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा शिमगोत्सव धुम आता सुरू झाली आहे.दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात गेल्या दोन वर्षांत कोरोनाचे संकट लक्षात घेऊन काही निर्बंध घातले गेले होते त्यामुळे शिमगोत्सव धुमधडाक्यात साजरा करता आला नव्हता पण यावेळी कोरोनाचे संकट टळले आहे त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात होळी पौर्णिमेपासून शिमगोत्सव सुरुवात होत.

त्यामुळे दोडामार्ग साटेली भेडशी बाजारपेठ पिचकाऱ्या तसेच विविध प्रकारचे रंग तसेच मुखवटे दाखल झाले आहेत. तसेच दोडामार्ग नजीक असलेल्या साळ गोवा येथे देखील तीन दिवस चालणाऱ्या गडे उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक दाखल होतात.

You cannot copy content of this page