मतदारांच्या महिलांना मंगळसूत्राची धमक्या देऊन जिल्हा बँक घेतली ताब्यात

खा विनायक राऊत वाढदिवस कार्यक्रमात सतीश सावंत यांचा आरोप

सावंतवाडी ता.१५-:* जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मतदारांच्या महिलांना मंगळसूत्रांची भीती दाखवून तुमच्या असलेल्या गळ्यातील मंगळसूत्र सुरक्षित पाहिजे असेल तर सतीश सावंत यांनी मतदान करू नका अशा प्रकारच्या धमक्या देऊन त्यांनी विजय मिळवला आहे असा आरोप माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले आहे.

तर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकावर भगवा फडकविण्यासाठी काम केले पाहिजे जनताही आमच्या बाजूने आहे मात्र त्यांना दिशाभूल करण्याचे काम विरोधकांकडून होईल यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे असून प्रत्येकाचे योगदान हे निश्चितच महत्त्वाचे असेल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले

You cannot copy content of this page