मालवण ता.१५-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणने बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै करंडक २०२२ राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा १५ मार्च रोजी येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी आधुनिक भारताचे एक शिल्पकार ‘बॅ. नाथ पै, लोकशाही भंगारात निघू नये म्हणून, खरा धर्म, धर्माच्या पलिकडचा, तोच खरा ‘वक्ता दशसहस्त्रेषु!, ट्रोल होणं मानवी आहे, टोल करणं नाही’ हे विषय असणार आहेत.
स्पर्धेतील प्रथम विजेत्याला १५ हजार, द्वितीय १३ हजार, तृतीय ११ हजार, चतुर्थ १० हजार, पाचवा क्रमांक ७ हजार, तर उत्तेजनार्थ पाच विजेत्यांना प्रत्येकी २ हजार रुपये व अनुक्रमे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ८४४६६९५४३४ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
