सामाजिक उपक्रम राबवत खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस मालवण येथे साजरा ..

मालवण दि प्रतिनिधी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस आचरा विभागात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. आचरा शिवसेना विभागप्रमुख समीर लब्दे यांच्या नेतृत्वाखाली आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे खासदार राउत यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आली यावेळी रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ जाधव तसेच डॉ कपिल मैस्त्री यांचा उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास विभाग प्रमुख समीर लब्दे विभाग संघटक चंद्रकांत गोलतकर शहर प्रमुख राजू नार्वेकर गावचे माजी सरपंच शिवसैनिक शाम घाडी आचरा उपसरपंच पांडुरंग वाईंगणकर उपविभाग प्रमुख जगदीश पांगे, रुपेश साटम, रुपेश घाडी, मुन्ना परब आदी व इतर उपस्थित होते यावेळी विनायक परब यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना प्रोटीनचे वाटप करण्यात आले

You cannot copy content of this page