ओसरगाव येथे काजू आंबा बागेला आग

बागायतदार शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

कणकवली ता.१५-:* एकीकडे अंगाची लाही करणाऱ्या उन्हाच्या झळा बसू लागल्या असतानाच दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथील हॉटेल शर्मिला नजीक काजू आंबा बागायतीला अचानक लागलेल्या आगीमुळे बागायतदार शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. ओसरगाव येथे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आग लागली. नॅशनल हायवेलगतच्या काजू, आंबा बागायतीस लागलेली आग लक्षात येताच ओसरगाव माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली.

उपलब्ध साधनांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले, परंतु भर दुपारच्या उन्हात लागलेल्या आगीचा भडका आणखी उडाल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती. कणकवली नगरपंचायतला आगीबाबत कळवून अग्निशामक बंब मागविण्यात आला असून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू करण्यात आले मात्र आगीमुळे ऐन काजू हंगामातच काजू झाडे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page