विद्यार्थ्यांनी घेतला विक्रेत्याचा अनुभव

वेंगुर्ला ता.१५-:* नेहमी पालकांसोबत ग्राहक म्हणून खरेदी करण्याचा अनुभव घेणा-या लहान मुलांनी विविध खाद्यपदार्थांची दुकाने मांडत आपण स्वतःच विक्रेते झाले. मार्केटींगचा कोणताही अनुभव नसताना आपल्या वस्तूंची विक्री करतानाचा एक वेगळाचा आनंद लहान मुलांच्या चेह-यावर दिसत होता.

वेंगुर्ला येथील श्री शिवाजी प्रागतिक शाळेमध्ये १४ मार्च रोजी बाल आनंद मेळावा घेण्यात आला. लहान वयातच मुलांना व्यवहार ज्ञान समजावे यासाठी त्यांना विक्री स्टॉल लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. पालकांनी आपल्या मुलांना विविध खाद्यपदार्थ बनवून दिले. यात २५ स्टॉल लावत मुलांनी आपल्या खाद्यपदार्थांची विक्री केली. शाळेतील शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देत खरेदी केली.

You cannot copy content of this page