देवगड शहराचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे नगरसेवक कटिबध्द…

जनतेचा विश्वास नगरसेवक सार्थ ठरवतील; भैरी भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष अतुल रावराणे यांनी व्यक्त केला विश्वास…

देवगड देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांची सेवा करण्याचे व्रत शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी घेतले असून प्रत्येक नगरसेवक हा समाजकारणातून राजकारणात आलेला आहे .या दोन्ही शहरांचे आपण देणे लागतो याची जाणीव प्रत्येक नगरसेवकाला असुन या दोन्ही शहरांचा विकास येत्या दोन वर्षात अधिकाधिक प्रमाणात करण्याकरता देवगड जामसंडे नगरपंचायतीचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कटिबद्ध आहेत .

येथील मतदारांनी शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास ठेवून शिवसेनेचा भगवा या नगर पंचायतवर फडकविला व शहरवासीयांच्या विश्वासाला सर्व नगरसेवक पात्र ठरले आहेत. अशी प्रतिक्रिया भैरी भवानी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा नियोजन समिती सदस्य अतुल रावराणे यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

देवगड जामसंडे नगरपंचायत शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक यांचा विशेष सत्कार भैरीभवानी प्रतिष्ठान च्या वतीने देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालयात सुपारी वृक्ष व शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अतुल रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी विरोधी गटाचे गटनेते शरद ठुकरूल यांचाही विशेष सन्मान अतुल रावराणे यांनी केला . यापुढे बोलताना रावराणे म्हणाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोकणावरअपार प्रेम असून देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील देवगडची किनारपट्टीचा भाग पर्यटनदृष्ट्या विकसित करणे व त्याकरिता भरघोस निधी मिळवून देण्यासाठी नाम.आदित्य ठाकरे हे विशेष कटिबद्ध आहेत.

येथील पर्यटनाला चालना देणे व शहरवासीयांचे विश्वास संपादन करण्याकरता शहरातील मागील पाच वर्षात रखंडलेले प्रश्न येत्या दोन वर्षात मार्गी लावण्याकरिता शिवसेना राष्ट्रवादी नगरसेवक कटिबद्ध असून या विकास कामांच्या जोरावर पुढील पंचवीस वर्षे या भागातून शिवसेना राष्ट्रवादीचे नगरसेवक भरघोस मतांनी विजयी होतील व या नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा कायमस्वरूपी राहील. असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

यापूर्वी सत्ताधारी राणे भाजप समर्थक यांनी जो काही भ्रष्टाचाराचा भस्मासूर उभा केला आहे त्याच्या मुळापर्यंत जाऊन शहरवासीयांच्या विकासाकरता खर्च होणाऱ्या पैशाचा गैरवापर होणार नाही याची दक्षता प्रामुख्याने घेतली जाणार आहे. या भागातील लोकप्रिय खासदार विनायक राऊत पालकमंत्री उदय सामंत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तसेच सर्व नियोजन समिती सदस्यांच्या सहकार्याने अधिकाधिक निधी देवगड जामसंडे नगरपंचायत देण्यासाठी त्याचप्रमाणे पर्यटन व पर्यावरण याचा समतोल राखून अधिकाधिक सोयीसुविधा व आवश्यक त्या उपाययोजना आगामी काळात या नगरपंचायतीचा माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले यावेळी उपनगराध्यक्ष साक्षी प्रभू उपनगराध्यक्ष मिताली सावंत वन्य नगरसेवक विषय समिती सभापती उपस्थित होते.

You cannot copy content of this page