तर महिला गटात होलिक्रॉस सावंतवाडी संघ विजेता…
देवगड,दि.१३ मार्च सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या मान्यतेने देवगड तालुका कबड्डी फेडरेशन च्या सहकार्याने शुभम स्पोर्टस् जामसंडे आयोजित आम. नितेश राणे पुरस्कृत जिल्हास्तरीय महिला व पुरुष गट दिर्बा-रामेश्वर चषक कबड्डी स्पर्धा” मध्ये रेवतळे मालवण या संघाने चषकावर नाव कोरले तर उपविजेता म्हणून गुढीपूर कुडाळ या संघाने चषकावर आपले नाव कोरले.महिला गटात हॉलिक्रॉस सावंतवाडी संघ विजेता ठरला तर उपविजेता महिला संघ कुडाळ ठरला. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला इंद्राबाई महादेव ठाकूर कला क्रीडा नगरी येथे रविवारी उपांत्य फेरी व अंतिम फेरीचे सामने झाले जिल्हास्तरीय स्पर्धेतील अंतिम सामना मालवण रेवतळे विरुद्ध गुढीपूर कुडाळ या संघांमध्ये झाला.
शेवटचा सामना पाहण्यासाठी क्रीडा रसिक शेवटपर्यंत जागेवर खेळून बसले होते हा सामना रेवतळे मालवण संघाने जिंकत चषकावर नाव कोरले विजेत्या १० हजार रुपये व चषक देण्यात आला गुढीपूर कुडाळ पविजेता संघ यांना रोख रक्कम ०७ हजार व चषक देण्यात आला उत्कृष्ट चढाई जितीन कांबळी (रेवतळे मालवण) उत्कृष्ट पकड मंदार आंबेरकर(रेवतळे मालवण) अष्टपैलू खेळाडू सुमित गावडे (गुडीपूर कुडाळ) या संघांना १ हजार रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले उपांत्य फेरीत पराभूत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीराम भटवाडी, चतुर्थ क्रमांक मानकरी शुभम स्पोर्ट क्लब जामसंडे या दोन्ही संघांना ०३ हजार रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामना रेवतळे मालवण (३६) विरुद्ध गुढीपूर कुडाळ(१७) यांच्यामध्ये झाला असला तरी मालवण रेवतळा यांनी सोळा गुण अधिक मिळवत चषकावर नाव कोरले उपांत्य फेरीमध्ये श्रीराम भटवाडी(०८) विरुद्ध मालवण रेवतळे(२०) या संघाने बारा गुण अधिक मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला तसेच शुभम स्पोर्ट्स जामसंडे(१८) विरुद्ध गुढीपूर कुडाळ(२५)यांच्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात गुढी पूर कुडाळ यांनी सात गुण अधिक मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
