Headlines

माडाचे झाड घरावर पडल्याने घराचे नुकसान…

वैभववाडी प्रतिनिधीतालुक्यात गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी वारे व पावसामध्ये खंबाळे येथील हरिचंद्र गोपाळ जाधव यांच्या घरावर माडाचे झाड पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने इतर कोणतीही हानी झाली नाही. तालुक्यात मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली असून शेतकऱ्यांनी शेतीचा कामाला सुरुवात केली आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास सह्याद्री पट्ट्या, सहलुक्‍यात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे…

Read More

तळाशील – तोंडवळ- हंडी मार्गे ओझर विद्यामंदिर अशी एस्टी बसफेरी सुरू करा…

ओझर विद्यामंदिरच्या वतीने मालवण एस्टी आगारात मागणी… मालवण (प्रतिनिधी) तळाशील – तोंडवळी येथील विद्यार्थी आज पर्यंत होडीचा प्रवास करून कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर मध्ये येत होते. मात्र ही होडी सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसमोर शाळेत कसे यायचे हा प्रश्न निर्माण झाला असून ही गैरसोय दूर करण्यासाठी तळाशील- तोंडवळी – हडी मार्गे ओझर विद्यामंदिर अशी एसटी बसफेरी…

Read More

उद्योजिका मेघा सावंत यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर कोंकण विभागीय सदस्यपदी निवड

मालवण दि प्रतिनिधीमालवणमधील यशस्वी उद्योजिका मेघा सावंत यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरच्या महिला उद्योजक समितीवर कोकण विभागासाठी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. कुडाळ येथील चेंबरच्या महिला उद्योजकता विकास परिषदेच्या वेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा…

Read More

ग्लोबल महाराष्ट्र न्यूज इफेक्ट

गुळदुवे येथील कोसळलेला ‘तो’ वटवृक्ष अखेर केला बाजूला ⚡सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ-: मागील सतत दोन दिवस पडणाऱ्या पहिल्याच पावसामुळे गुळदुवे (घोगळेवाडी) येथील वटवृक्षाला फटका बसला होता. रस्त्याच्या बाजूला असणारा हा वटवृक्ष पहाटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर कोसळला होता. मात्र चार पाच दिवस झाले तरी याची दखल कोणीही घेतली नव्हती. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता होती. याबाबत ग्लोबल…

Read More

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची पूर्वतयारी भाजपकडून सुरू

प्रदेश सचिव निलेश राणे यांनी घेतला आढावा ⚡मालवण ता.१६-: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका पावसाळ्या नंतर कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपाने या निवडणूकांमध्ये १०० टक्के यश मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी मालवण येथील निलरत्न निवासस्थानी सशक्त बुथ अभियान अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक बूथनिहाय आढावा घेतला….

Read More

कोंडुरा पारिजात रंगमंचावर 18 रोजी ‘महावीर भगदत्त’ नाट्यप्रयोग

बांदा : प्रतिनिधीअमोल पुनाळेकर मित्रमंडळ आरोस दांडेली कोंडुरा यांच्यावतीने शनिवार 18 जून रोजी सायंकाळी 7 वाजता पारिजात रंगमंच कोंडुरा येथे संयुक्त दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘महावीर भगदत्त’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.

Read More

दीपक पेडणेकर यांना जिल्हा परिषदेचा आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान….

⚡मालवण ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने दिला जाणारा आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार मसुरे गावचे सुपुत्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी दीपक पेडणेकर यांना जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्गुच्छ असे…

Read More

तोंडवळी एसटी बस फेऱ्या पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी

⚡मालवण ता.१६-: तोंडवळी खालची (तळाशिल) येथे एसटी बस जात नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे जागेची त्वरित पाहणी करून एसटी बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी तोंडवळीचे माजी सरपंच आबा कांदळकर यांनी कणकवली आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कणकवली आगाराच्या दोन एसटी बसेस (कणकवली-तोंडवळी) अशा सुरू असून या बसेस वळविण्यास पुरेशी जागा नसल्याचे…

Read More

भंडारी प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव साजरा

⚡मालवण ता.१६-: राज्यातील शाळांचे २०२२- २०२३ हे नवे शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरू झाले असून मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेत यानिमित्त नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सर्व शिक्षा मोहिमेअंतर्गत पुरविण्यात आलेल्या मोफत पाठपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी स्कुल कमिटीचे सदस्य प्रकाश…

Read More

मालवण काँग्रेसने दिली नगर पालिकेवर धडक

शहरातील मैला कोळंब खाडीत सोडत असल्याचा केला आरोप:आंदोलनाचाही दिला इशारा मालवण (प्रतिनिधी) मालवण मधील कॉम्प्लेक्स मधील सांडपाणी, कचरा आदी समस्यांसह शहरातील शौचालयांमधील मैला नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून कोळंब खाडीत सोडला जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज मालवण नगरपालिकेत धडक देत आरोग्य निरीक्षकांना धारेवर धरले. मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकाराचा खुलासा करावा अन्यथा काँग्रेसला ऍक्शन मोड मध्ये येऊन…

Read More
You cannot copy content of this page