दीपक पेडणेकर यांना जिल्हा परिषदेचा आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान….

⚡मालवण ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने दिला जाणारा आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार मसुरे गावचे सुपुत्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी दीपक पेडणेकर यांना जिल्हा परिषद कर्मचारी, अधिकारी यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्गुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते

या वेळी अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कापडणीस, वित्त अधिकारी श्रीमती वल्लरी गावडे कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, मालवण गटविकास अधिकारी गुजर , सावंतवाडी गटविकास अधिकारी श्री. नाईक , पाणी स्वच्छता मिशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ठाकूर , शिक्षणाधिकारी धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद मधील अतिशय चांगल्या अशा कामाची दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन दीपक पेडणेकर याचा आदर्श गुणवंत जिल्हा परिषद कामगार पुरस्कार देऊन गौरव केला. यापूर्वी दीपक पेडणेकर यांच्या कामाची दखल प्रशासनाने घेऊन त्याला वेळोवेळी अनेक पुरस्काराने सन्मानित केले होते.

फोटो कॅप्शन.
ओरस येथे जिल्हा परिषदेचा आदर्श गुणवंत कामगार पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित नायर यांच्या हस्ते स्वीकारताना दीपक पेडणेकर सोबत मान्यवर..

You cannot copy content of this page