ग्लोबल महाराष्ट्र न्यूज इफेक्ट

गुळदुवे येथील कोसळलेला ‘तो’ वटवृक्ष अखेर केला बाजूला

सावंतवाडी ता.१६सहदेव राऊळ-: मागील सतत दोन दिवस पडणाऱ्या पहिल्याच पावसामुळे गुळदुवे (घोगळेवाडी) येथील वटवृक्षाला फटका बसला होता. रस्त्याच्या बाजूला असणारा हा वटवृक्ष पहाटे पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर कोसळला होता. मात्र चार पाच दिवस झाले तरी याची दखल कोणीही घेतली नव्हती. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता होती. याबाबत ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलने बातमी प्रसिद्ध केली होती,

याची बांधकाम विभागाचे आवटी यांनी तात्काळ दखल घेत याबाबत सुरेश गावडे (सावंतवाडी) यांची टीम पाठवून रस्त्यावर कोसळलेला हा वटवृक्ष बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला करून दिला. त्यामुळे येथील ग्रामस्थ, वाहनचालकांकडून समाधान व्यक्त होत आहे

You cannot copy content of this page