प्रदेश सचिव निलेश राणे यांनी घेतला आढावा
⚡मालवण ता.१६-: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका पावसाळ्या नंतर कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपाने या निवडणूकांमध्ये १०० टक्के यश मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी मालवण येथील निलरत्न निवासस्थानी सशक्त बुथ अभियान अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक बूथनिहाय आढावा घेतला. यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत १०० टक्के यश मिळण्यासाठी आढावा घेण्यात आला. यावेळी बुथ सक्षम करण्यावर भर देण्यात यावा, अशा सुचना करण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, बाबा मोंडकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, महेश मांजरेकर, विजय निकम यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
