तळाशील – तोंडवळ- हंडी मार्गे ओझर विद्यामंदिर अशी एस्टी बसफेरी सुरू करा…

ओझर विद्यामंदिरच्या वतीने मालवण एस्टी आगारात मागणी…

मालवण (प्रतिनिधी)

तळाशील – तोंडवळी येथील विद्यार्थी आज पर्यंत होडीचा प्रवास करून कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर मध्ये येत होते. मात्र ही होडी सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसमोर शाळेत कसे यायचे हा प्रश्न निर्माण झाला असून ही गैरसोय दूर करण्यासाठी तळाशील- तोंडवळी – हडी मार्गे ओझर विद्यामंदिर अशी एसटी बसफेरी सुरू करावी अशी मागणी ओझर विद्यामंदिरच्या वतीने मालवण एसटी आगाराकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर प्रशालेमध्ये तळाशील-तोंडवळी, हडी, कांदळगाव, कातवड, रेवंडी या पंचक्रोशीतून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. तळाशील- तोंडवळी येथील विद्यार्थी आजपर्यंत होडीच्या प्रवासाची जोखीम पत्करून शाळेमध्ये येत होते. परंतु आता तरीच्या होडीची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा शाळेमध्ये येण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तळाशील-तोंडवळी येथील पालकांनी व ग्रामस्थांनी ओझर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन एस.टी. बस सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ही समस्या सोडविण्यासाठी ओझर विद्यामंदिरच्यावतीने तळाशील-तोंडवळी-हडी मार्गे ओझर विद्यामंदिर अशी एस.टी. बस सुरू करण्यासाठी मालवण एस.टी. आगारप्रमुखांकडे तातडीने निवेदन दिले. याप्रसंगी ओझर विद्यामंदिरचे शिक्षक तसेच संस्थाचालक तथा मालवणचे माजी सभापती उदय परब उपस्थित होते.

सदर एस.टी. बस सुरू झाली तर तोंडवळी-तळाशील बरोबरच हडी येथील विद्यार्थीही या बसने शाळेमध्ये येऊ शकतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही बस फेरी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी ओझर विद्यामंदिरच्यावतीने या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

You cannot copy content of this page