⚡मालवण ता.१६-: राज्यातील शाळांचे २०२२- २०२३ हे नवे शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरू झाले असून मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेत यानिमित्त नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सर्व शिक्षा मोहिमेअंतर्गत पुरविण्यात आलेल्या मोफत पाठपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी स्कुल कमिटीचे सदस्य प्रकाश कुशे यांच्या दातृत्वातून मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक मिलिंद भगत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रज्ञा कांबळी यांनी केले. तर भुपेश गोसावी यांनी आभार मानले.
