Headlines

मालवणात उद्या शिवसेनेकडून आम. वैभव नाईकांचे होणार जल्लोषी स्वागत

⚡मालवण ता.२५-: शिवसेनेत आमदारांच्या बंडामुळे उलथापालथ झाली असली तरी मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेशी आपली निष्ठा कायम ठेवत स्वाभिमान दाखविला आहे. म्हणूनच दि. २६ जून रोजी मालवणात येणाऱ्या आम. वैभव नाईक यांचे मालवण तालुका शिवसेनेतर्फे जोरदार जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण शिवसेना शाखा येथे आयोजित पत्रकार…

Read More

मालवण तालुक्यातील शिवसैनिक कायम शिवसेना व ठाकरेंसोबत – हरी खोबरेकर

⚡मालवण ता.२५-: शिवसेना हे आमचे कुटुंब आहे. आज आम्ही विविध पदे ही शिवसेनेच्या जीवावरच भूषवित आहोत. शिवसेनेतून आमदार जातील, येतील. मात्र आम्ही नेहमीच शिवसेनेशी प्रामाणिक राहणार. आमचे नेतृत्व असणारे मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक हे प्रलोभनांना न भुलता शिवसेनेशी प्रामाणिक राहिले आहेत. मालवण तालुक्यातील आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेनेसोबत आहोत. पडत्या काळात संघर्ष करून शिवसेना वाढविण्याचे…

Read More

नगर वाचन मंदिर आणि नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्यातर्फे शिष्यवृत्ती

⚡मालवण ता.२५-: नगर वाचन मंदिर, मालवण आणि नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीपासून दहावी परिक्षेमध्ये सेमी इंग्लिश माध्यमातून संपुर्ण संस्कृत विषय घेऊन मालवण तालुक्यातील केंद्रातून प्रथम आलेल्या १ विद्यार्थी आणि १ विद्यार्थिनी यांना प्रत्येकी रु. १० हजार एवढी रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येणार आहे. यासाठी मालवण तालुक्यातील सर्व सहावी केंद्रांनी १ विद्यार्थी आणि १…

Read More

कृषी संजीवनी सप्ताहाचा माजगाव पडवे येथे शुभारंभ

बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचा शुभारंभ आज पडवे माजगाव येथे करण्यात आला. बांदा मंडळ अंतर्गत डेगवे सजा यांच्यावतीने महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी येथील जयवंत लक्ष्मण दळवी व भिवसेन नारायण देसाई यांच्या शेतावर काजू बागेची आखणी व वृक्ष लागवड तालुका कृषि अधिकारी प्रमोद बनकर, सरपंच लक्ष्मण गवस यांचे हस्ते…

Read More

मारुती मंदिर नजीक डंपर – रिक्षा अपघात

अपघातात रिक्षेचे मोठे नुकसान;प्रसंगावधान राखत रिक्षा चालकाने मारली उडी ⚡सावंतवाडी ता. २५- : येथील मारुती मंदिरनजिक डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यात रिक्षाचालकाने प्रसंगावाधन राखत उडी मारल्याने चालक बालबाल बचावला. दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. हा अपघात आज सकाळी साडे आठ च्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की,…

Read More

रमाकांत गावडे यांचेकडून बांदा केंद्रशाळेतील दोन विद्यार्थिनी दत्तक

⚡बांदा ता.२५-: सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत बांदा पानवळ कॉलेजचे प्राध्यापक श्री रमाकांत गावडे यांनी‌ जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नंबर एक या शाळेतील दोन विद्यार्थिनी दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकीचा आदर्श जोपासला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे यासाठी सावित्रीबाई दत्तक पालक योजना चालू केली आहे या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये भरून…

Read More

तळेरे पंचक्रोशीतील अनियमित वीजपुरवठ्याची समस्या

सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव आक्रमक ⚡कणकवली ता.२५-: तळेरे पंचक्रोशीतील अनियमित विज पुरवठ्याच्या समस्येबाबत आवश्यक ती ठोस अथवा पर्यायी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून महावितरण कंपनीचे संबंधित अधिकारी कोणतीच नियमोचित कार्यवाही करीत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा ह्युमन राईट्स असोसिएशनचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव महावितरण कंपनीच्या विरोधात लोकशाही मार्गाने आक्रमकरित्या आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. तळेरे पंचक्रोशीत गेल्या काही…

Read More

सरपंच विठ्ठलासारखा व गाव पंढरपूर सारखा असल्यास कोणतेही काम अडणार नाही : भास्करराव पेरेपाटील

मळगाव येथे स्वच्छ भारत व ग्रामीण जनजीवन मिशन अंतर्गत एक दिवसीय सरपंच व ग्रामसेवक कार्यशाळा संपन्न ⚡सावंतवाडी ता.२५सहदेव राऊळ-:: सरपंच विठ्ठलासारखा व गाव पंढरपूर सारखा असल्यास कोणतेही काम अडणार नाही, असा विश्वास पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरेपाटील यांनी मळगाव येथे व्यक्त केला. भारत देशाला जर महासत्ता बनवायचे असेल तर गावाचा सरपंच व ग्रामसेवक हुशार…

Read More

आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहून उद्धव ठाकरेंचे हात बळकट करणार: महेश कोळसुलकर

⚡कणकवली ता.२५-: शिवसेना पक्षात राहून व पद प्रतिष्ठा मिळवून त्याच शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून बाहेर पडलेल्या पक्षाशी आणि ठाकरे घराण्याशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. मात्र त्यांच्या जाण्याने शिवसेना पक्षावर काहीच परिणाम होणार नसून आम्हीं बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांचे हात अधिक बळकट करणार असल्याचे कणकवली…

Read More

आम्ही अजूनही शिवसैनिकच….

आमदार दीपक केसरकर; आम्ही २/३ बहुमत सिद्ध करणार… ⚡सावंतवाडी ता.२५-: आम्ही अजूनही शिवसैनिक असून, आम्ही शिवसेना कधीच सोडणार नाही. असे स्पष्टीकरण शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, ५५ आमदारांचे नेते १६ लोक बदलू शकत नाही. झिरवाळांचा निर्णय आम्हाला मान्य…

Read More
You cannot copy content of this page