मारुती मंदिर नजीक डंपर – रिक्षा अपघात

अपघातात रिक्षेचे मोठे नुकसान;प्रसंगावधान राखत रिक्षा चालकाने मारली उडी

⚡सावंतवाडी ता. २५- : येथील मारुती मंदिरनजिक डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यात रिक्षाचालकाने प्रसंगावाधन राखत उडी मारल्याने चालक बालबाल बचावला. दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. हा अपघात आज सकाळी साडे आठ च्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, डंपर चालक हा आज सकाळी आठच्या सुमारास तळवडेहून सावंतवाडीच्या दिशेने जात होता. तर रिक्षा चालक हा सावंतवाडीहून तळवडेच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहने येथील मारुती मंदिर नजीकच्या पुलाजवळ आली असता डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती की रिक्षा तब्बल १०० मीटर अंतरावर भरकटत गेली. रिक्षा चालकाने प्रसंगवधान राखत उडी मारल्याने बालबाल बचावला. यात ते किरकोळ जखमी झाले. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार अनिल गावडे व स्थानिक महादेव गावडे, शरद गावडे यांनी त्या रिक्षा चालकास मदत केली. घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर डंपर मालकास घटनास्थळी बोलवण्यात आले. अखेरीस तडजोडीने हे प्रकरण मिटविण्यात आले.

You cannot copy content of this page