Headlines

तायक्वांदो स्पर्धेत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या मुशेब पटेलची विभागीय स्तरावर निवड

१९ वर्षांखालील ५१ ते ५५ किलो वजनी गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक

कुडाळ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १२ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या बारावीतील विद्यार्थी मुशेब पटेल याने १९ वर्षांखालील ५१ ते ५५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्तरावर निवड मिळवली.
मुशेब पटेल आता कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धा १ ते ३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रेणुका हॉल, वाठार-तळसंदे रोड, तळसंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे होणार आहेत.
मुशेबच्या या यशाबद्दल बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. पल्लवी कामत, ज्येष्ठ क्रीडाशिक्षक रोहिदास राणे, शालेय व्यवस्थापन तसेच शिक्षक-पालक संघाच्या प्रतिनिधींनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page