नगर वाचन मंदिर आणि नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्यातर्फे शिष्यवृत्ती

⚡मालवण ता.२५-: नगर वाचन मंदिर, मालवण आणि नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीपासून दहावी परिक्षेमध्ये सेमी इंग्लिश माध्यमातून संपुर्ण संस्कृत विषय घेऊन मालवण तालुक्यातील केंद्रातून प्रथम आलेल्या १ विद्यार्थी आणि १ विद्यार्थिनी यांना प्रत्येकी रु. १० हजार एवढी रक्कम शिष्यवृत्ती स्वरूपात देण्यात येणार आहे.

यासाठी मालवण तालुक्यातील सर्व सहावी केंद्रांनी १ विद्यार्थी आणि १ विद्यार्थिनी यांची नावे दि.५ जुलै पर्यंत नगर वाचन मंदिर, मालवण कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाठवावीत. मालवण तालुक्यातील सर्व दहावी केंद्रामधील शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनी निवडताना चित्रकला, खेळ व इतर कौशल्ये यांचाही विचार करण्यात येणार आहे, अशी माहिती वाचन मंदिराचे उपाध्यक्ष उदयराव मोरे व कार्यवाह नागेश कदम यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क संजय शिंदे ग्रंथपाल (९४२२२३४९५०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page