दादासाहेब परळकर यांचा हेटकरी भंडारी समाज मंडळातर्फे सत्कार

मालवण दि प्रतिनिधी
“समाजातील होतकरू मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिलो असून, यापुढेही आपल्या परीने हे कार्य सुरू ठेवणार आहोत हेटकरी भंडारी समाज मंडळाने समाजातील होतकरू लोकांसाठी सुरु केलेले कार्य कौतुकास्पद असून मंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची परंपरा यापुढेही अशीच जोपासावी, समाजहितासाठी विविध उपक्रम राबवावेत असे प्रतिपादन वेंगुर्ल्याचे सुपुत्र आणि उद्योगपती सदाशिव उर्फ दादासाहेब परळकर यांनी येथे दादर मुंबई येथे बोलताना केले
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती सदाशिव उर्फ दादासाहेब परळकर यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त हेटकरी भंडारी समाज मंडळ, दादर यांच्या वतीनेमंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ मिठबांवकर यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी श्री परळकर यांना भंडारी समाज भूषण उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी व्यासपीठावर सौ परळकर, विश्वस्त तुषार कांबळी, , खजिनदार नंदकुमार कांबळी, सेक्रेटरी अनिकेत रेवंडकर, बाळ वाडवलीकर आदी व इतर उपस्थित होते
सत्काराला उत्तर देताना दादा परळकर यांनी हेटकरी भंडारी समाज मंडळाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले तसेच मंडळाने केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानताना
हेटकरी भंडारी समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे आपण पुन्हा एकदा मंडळाशी जोडले गेलो असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
दादासाहेब परळकर यांच्या प्रदीर्घ सामाजिक योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
