श्री. भीमसेन गायकवाड ; वेंगुर्ला लाईट हाऊस येथील घटना..
⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला येथील लाईट हाऊसच्या मागे समुद्राच्या पाण्यात पडून
अणसुर देऊळवाडी येथील रहिवासी सचिन सिताराम गावडे (वय 31) हा नापत्ता झाला होता. ही घटना गुरुवारी सायंकाळी 5.15 वा. च्या सुमारास घडली होती. त्याचा मृतदेह
आज शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ला लाईट हाऊस निमुजगा नजीक समुद्रात खडकाळ भागात आढळून आला आहे, अशी माहिती वेंगुर्ला पोलीस हवालदार योगेश राऊळ यांनी दिली.
यासाठी स्थानिक ग्रामस्थ, अणसुर ग्रामस्थ, उभादांडा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, पोलीस प्रशासन, मत्स्यविभाग ड्रोन
यांनी शोध मोहिमेत परिश्रम घेतले.स्थानिक ग्रामस्थांनी सदर मृतदेह बाहेर काढला.
गुरुवारी सायंकाळी अणसूर येथील सचिन गावडे व शंकर मेस्त्री हे मासे पकडण्यासाठी वेंगुर्ला लाईट हाऊस च्या मागे खडकावरून समुद्रात गळ टाकून मासे पकडत असताना सचिन गावडे याचा तोल जाऊन ते समुद्राच्या पाण्यात पडून नापत्ता झाले होते.
आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे अणसुर भागासह वेंगुर्ला तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगवान चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.
नुकताच मोचेमाड गाबीतवाडी येथील युवकाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मूत्यू झाला होता.
