तळेरे पंचक्रोशीतील अनियमित वीजपुरवठ्याची समस्या

सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव आक्रमक

⚡कणकवली ता.२५-: तळेरे पंचक्रोशीतील अनियमित विज पुरवठ्याच्या समस्येबाबत आवश्यक ती ठोस अथवा पर्यायी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून महावितरण कंपनीचे संबंधित अधिकारी कोणतीच नियमोचित कार्यवाही करीत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा ह्युमन राईट्स असोसिएशनचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव महावितरण कंपनीच्या विरोधात लोकशाही मार्गाने आक्रमकरित्या आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.

तळेरे पंचक्रोशीत गेल्या काही दिवसांपासून सतत अनियमित वीज पुरवठा सुरू आहे. दिवसा व रात्री किमान १५ ते २० वेळा वीज पुरवठा खंडित होतो. याचा विपरीत असा परिणाम होत आहे.
सदरची समस्या सामाजीककदृष्ट्या गंभीर असून त्याकडे महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी वर्गाने वेळीच लक्ष देणे व त्याबाबत आवश्यक ती ठोस अथवा पर्यायी उपाययोजना विनाविलंब, तातडीने व तात्काळ करणे गरजेचे होते व आहे. परंतु असे झालेले अथवा होत असलेले दिसून येत नाही
सबब सदर सर्व बाबी व समस्येच्या निवारणाच्या अनुषंगाने आवश्यक ती ठोस अथवा पर्यायी उपाययोजना महावितरण कंपनीने विनाविलंब, तातडीने व तात्काळ करावी, याकरिता महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी वर्गाशी शांततामय मार्गाने सकारात्मक चर्चा लेखी निवेदन देऊन करण्यात आलेली आहे. तरी देखील महावितरण कंपनीच्या संबंधीत अधिकारी वर्गाने योग्य ती दखल न घेतल्यास व येत्या चार दिवसांत समस्या ‘जैसे थी वैसी’ राहिल्यास,महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी वर्गास ग्राहकांना वीज बिल भरणा करणेची सक्ती अथवा ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करणे इ. प्रकारची कार्यवाही करू देणार नाही. अन्यथा नाईलाजाने लोकशाही व संविधानिक मार्गाने महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकारी यांचे विरोधात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. असा गंभीर इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा ह्युमन राईट्स असोसिएशनचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी महावितरण कंपनीस दिला आहे.

You cannot copy content of this page