आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहून उद्धव ठाकरेंचे हात बळकट करणार: महेश कोळसुलकर

⚡कणकवली ता.२५-: शिवसेना पक्षात राहून व पद प्रतिष्ठा मिळवून त्याच शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून बाहेर पडलेल्या पक्षाशी आणि ठाकरे घराण्याशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. मात्र त्यांच्या जाण्याने शिवसेना पक्षावर काहीच परिणाम होणार नसून आम्हीं बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांचे हात अधिक बळकट करणार असल्याचे कणकवली शिवसेना उपतालुका प्रमुख महेश उर्फ गोट्या कोळसलकर यांनी सांगितले.
खारेपाटण,तळेरे व नांदगाव विभागातीलत सर्व विभाग प्रमुख व शिवसेना शाखा प्रमुख हे सर्व कार्यकर्ते पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असून तळागाळतील शिवसैनिक हा शिवसेनाचा निष्ठावान कार्यकर्ता असून त्याच्या जोरावरच शिवसेना उभी असल्याचे देखील उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर यांनी प्रसिद्ध पत्रकद्वारे सांगितले.

You cannot copy content of this page