Headlines

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने मालवण दांडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम…

प्लास्टिक कचऱ्याची समस्या हा पर्यावरणासाठी फार मोठा धोका आहे:राजेसाहेब खेमसावंत भोंसले ..

⚡सावंतवाडी ता.३०-:
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त ) सावंतवाडी च्या वतीने, राष्ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्था, चेन्नई,पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून ,मालवण येथील दांडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या स्वच्छता अभियानाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मालवण नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, संजय पवार, माजी वन अधिकारी श्री सुभाष पुराणिक,कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ. गणेश मर्गज,
श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या एन.एस.एस विभागाचे समन्वयक डॉ. एस एम बुवा व डॉ. डी.बी शिंदे, प्रा. एम व्ही भिसे, प्रा.रोहन सावंत,कांदळवन विभागाच्या प्राजक्ता पाटील,केदार पालव,मोहिनी बी, दीपक जाधव, पूजा लुटे,मयूर पौसारे, विजय कुडाळकर, यु एन डी पी चे रोहित सावंत, दिलासा फाउंडेशनच्या श्रुती जाधव,श्रेया शोकनवार, हिमांशू कदम, वसुंधरा जनकल्याण फाउंडेशनचे अॅड.ऐश्वर्य मांजरेकर, युथ बीट्स फॉर क्लायमेटच्या मेगल डिसोजा, दर्शन वेंगुर्लेकर, स्वाती पारकर, राहुल जाधव, वनशक्ती फाउंडेशनचे यथार्थ खवणेकर, महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. शलाका वालावलकर डॉ. रविना गवस प्रा.तन्वी नाईक, प्रा.श्वेता जाधव, एनसीसी विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व उपस्थित आणि दांडी समुद्र किनाऱ्यावरील कचरा गोळा केला यामध्ये, मासेसे पकडण्यासाठी वापरलेली जाळी, प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक रॅपर्स, काचेच्या बॉटल्स, रबर च्या वस्तू, चप्पल्स असा अनेक प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला.
याप्रसंगी राजेसाहेब खेमसावंत भोंसले म्हणाले की समुद्रकिनारी फार मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांच्या माध्यमातून कचरा टाकला जातो यामध्ये प्लास्टिक ही मोठी समस्या आहे,हा प्लास्टिकचा कचरा समुद्रात जाऊन प्रदूषण करतो व त्यामुळे येथील मासे व इतर जलचर यांच्यावर परिणाम होतो. महाविद्यालयाच्या वतीने हा एक स्तुत्य उपक्रम इथे राबविण्यात आला. लोकांमध्ये जागृती करणं अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून येथे कचरा होणार नाही. मालवण नगरपरिषद, कांदळवन विभाग यु एन डी पी दिलासा फाउंडेशन फॉर क्लायमेट, इकोमेट, वनशक्ती असे विविध संस्थानी येथे सहभाग दर्शविला यासाठी त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. वन अधिकारी श्री सुभाष पुराणीक यांनी प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्यामुळे तो अनेक वर्ष टिकून राहतो व त्याचा परिणाम येथील पर्यावरणावर होतो. प्लास्टिक ही आजची जागतिक समस्या बनलेली आहे त्यामुळे या प्लास्टिक कचऱ्याचे करायचं काय हा मोठा प्रश्न जगासमोर आहे. हा कचरा जाळल्यास त्यापासून प्रदूषण होतं व साठवून ठेवल्यास त्याचे विघटन होत नाही त्यामुळे फार मोठी समस्या जगाला भेडसावत आहे असे ते म्हणाले त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणे हाच त्यावर उपाय आहे.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. जमलेला कचरा मालवण नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात आला. कार्यक्रमाची समन्वयक डॉ. गणेश मर्गज यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page