Headlines

दुष्काळी परिस्थितीत वैभववाडीतील शेतांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी…

⚡वैभववाडी ता.३०-: तालुका दुष्काळी म्हणून घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वैभववाडी तालुक्यातील तिन्ही जि प मतदार संघ व सहा पंचायत समिती मतदार संघातील गावातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन जि प सदस्य व प स सदस्य व पंचायत समिती अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
या पाणी दौऱ्याला लोरे जी प मतदार संघातील खांबाळे प स मतदारसंघाती नावळे गावातून सुरुवात करण्यात आली.
पंचायत समिती सदस्य मंगेश लोके आणि जिल्हा परिषद सदस्य रिद्धी रितेश सुतार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भात व इतर पिकांची पाहणी केली.
नावळे, सांगुळवाडी, सडूरे-शिराळे, एडगाव-वायंबोशी, सोनाळी आणि खांबाळे येथे पिकांची स्थिती, पावसाअभावी झालेला परिणाम, संभाव्य नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून नुकसानीची माहिती घेण्यात आली.
तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांनी पीक नुकसानीची नोंद, उपलब्ध शासकीय मदत आणि आवश्यक प्रक्रियेबाबत माहिती दिली. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी अडुळकर यांनी दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या उपलब्ध सवलती व उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना शेतातच मार्गदर्शन केले. संबंधित गावांचे तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, पंचायत समिती सदस्या सुवर्णा संसारे,भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे,सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती माने, नावळे गावच्या सरपंच सोनल गुरव उपसरपंच संजय रावराणे ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके पोलीस पाटील स्नेहा शेळके, कृषी सहाय्यक बालाजी वाघमोडे ग्रामविकास अधिकारी संभाजी वाघमोडे, भाजपा तालुका सरचिटणीस रितेश सुतार, सांगुळवाडीचे माजी सरपंच प्रकाश पाटील, सांगुळवाडीचे प्रशासक उमेश देसाई, सोनाळीचे माजी सरपंच भीमराव भोसले व प्रकाश शेलार, सडूरेचे सरपंच दीपक चव्हाण, कृषी सहायक मीनाक्षी भुजंग, तलाठी केदारी बागल, गणेश गोडे ग्रामपंचायत अधिकारी सविता काळे, ग्रामपंचायत प्रशासक रामचंद्र जाधव, नावळे तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश गुरव, माजी सरपंच लक्ष्मण रावराणे, विठोबा सुतार, गणेश पवार, पोलीस पाटील रुपेश कांबळे, राखी पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो नावळे येथील भात पिकाची पाहणी करताना जि प सदस्या रिद्धी सुतार मंगेश लोके सरपंच गुरव, संजय रावराणे संजय शेळके रमेश गुरव आधी शेतकरी छाया संजय शेळके वैभववाडी.

You cannot copy content of this page