आम्ही अजूनही शिवसैनिकच….

आमदार दीपक केसरकर; आम्ही २/३ बहुमत सिद्ध करणार…

⚡सावंतवाडी ता.२५-: आम्ही अजूनही शिवसैनिक असून, आम्ही शिवसेना कधीच सोडणार नाही. असे स्पष्टीकरण शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, ५५ आमदारांचे नेते १६ लोक बदलू शकत नाही. झिरवाळांचा निर्णय आम्हाला मान्य नसून, त्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकांची दिशाभूल केली जात आहे. यावेळी रस्त्यावर उतरण्याची केली जात असणारी भाषा चुकीची आहे. आम्हाला घबरविण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे. यावेळी बैठकीला गेलो नाही म्हणून नोटिसा का काढल्या असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

आम्ही शिवसेना विधिमंडळाचे सदस्य असून, आमच्याकडे कडे २/३ बहुमत आहे. आमच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे असल्याचे त्यानी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच बाळासाहेबांच्या नावाचा निर्णय निवडणूक आयोग घेईल आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page