⚡सावंतवाडी ता.२५- : जिमखाना ग्राउंडची बाउंड्री वाढवण्यासाठी नाल्यावर स्लॅब घालण्यापूर्वी जिमखाना जाधववाडी येथील घळणीची जेसीपी ने मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली होती, त्यावेळी जाधववाडी वस्तीतील लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता पण त्यांच्या विरोधाला न जुमानता नगरपरिषदेने काम सुरू ठेवले, अखेर आज सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही घळण कोसळली, परिणामी आज ही घळण कोसळल्याने याचा फटका मोठ्या प्रमाणात जाधववाडी वस्तीला बसणार आहे.
फक्त 20 फुटाच्या अंतरावर जाधववाडीतील लोकांची घर राहिलेली आणि घळण कोसळण्याचे प्रक्रिया अजूनही चालू आहे आणि हे असंच चालू राहिलं तर घरही खाली कोसळतील या भीतीने जाधववाडीतील लोक भयभीत झालेली आहेत, जर नगरपरिषदेने यावर योग्य तोडगा न काढल्यास जाधववाडीतील लोक सावंतवाडी नगर परिषदेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत .
