रुपेश राऊळ; सोमवारच्या सावंतवाडी येथील मोर्च्यात मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी राहावे उपस्थित…
आंबोली, ता.२५: आमदार केसरकर हे शिवसेनेतून कुठेही गेले तरी सर्व कार्यकर्त्यांनी आता पक्ष सांभाळणे आवश्यक आहे.शिवसेनेतूनच पुढचे येथील उमेदवार निवडून आले पाहिजेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सोमवारच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होवून पक्षाची ताकत दाखवा.असे शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आंबोलीत केले.
आंबोली येथे शिवसेना कार्यकर्ते यांच्या बैठकीसाठी तालुका प्रमुख रुपेश राऊळ,अपर्णा कोठावळे,गुणाजी गावडे,प्रशांत कोठावळे,विनायक (अब्जू)सावंत उपस्थित होते.यावेळी आंबोलीतील कार्यकर्ते,विभागीय अध्यक्ष बबन गावडे,उत्तम पारधी,विलास गावडे,नारायण कोरगावकर,सुनील नार्वेकर,अजित नार्वेकर,मायकल डिसोझा,हेमंत नार्वेकर, डुबाजी राऊत,मालू राऊत,कांता गुरव,दादा नाटलेकर,साक्षी राऊत,करिश्मा गावडे,उदय गावडे,पिंकी कर्पे,विशाल बांदेकर,अनिल चव्हाण,नाना पारधी,श्री.राऊत, चौकुळ मधून रुपेश गावडे,अरुण गावडे,तुकाराम गावडे,रतन गावडे,परशुराम गावडे,प्रकाश गावडे,विनोद गावडे,अंकुश गावडे,किशोर गावडे,आदी उपस्थित होते.यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्षातील सध्या दोलायमान स्थिती आहे.राजकारण काहीही असले तरी पक्ष म्हणून शिवसेना कार्यकर्ते यांनी एकनिष्ठ राहून पक्ष मजबूत राहिला पाहिजे पुढचे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य हे शिवसैनिक निवडून आले पाहिजेत.यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहा.सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चात सहभागी व्हा.असे प्रतिपादन श्री.राऊळ यांनी केले.
