शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांचा बंडखोर आमदारांना जोरदार टोला
⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्रात शिवसैनिकांच्या उद्रेकामुळे बंडखोर आमदार हादरले असून, त्यांना वर्तमानात आणि भविष्यात काडीची किंमत मिळणार नाही असा जोरदार टोला बंडखोर आमदारांना शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला आहे.
महाराष्ट्रातील सच्चा शिवसैनिकांमधून होत असलेला उद्रेक पाहून बंडखोर फितूर आमदारांनी आपल्या टोळीचे नाव शिवसेना बाळासाहेब ठेवण्याचे नाट्य रचले आहे. सूर्याजी पिसाळाच्या अवलादिनी बाळासाहेबांचे पवित्र नाव उचारणे हा सर्वसामान्य शिवसैनिकांचा आणि मतदारांचा अपमान आहे. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी हे सगळे नाट्य सुरू असल्याचे देखील उघड झाले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी आमदार दीपक केसरकर हे देखील फितूर झाले असून, फितूर गटाचे प्रवक्ते झाले असल्याची चिन्हं दिसत आहेत. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार विरोधात आमदार दीपक केसरकर यांना येथील जनतेने मोठ्या विश्वासाने विजयी केले होते. त्यांनी या जनतेचा केलेला अपमान येथील जनता कधीही विसरणार नाही असा इशारा देखील दिला आहे .
