मालवणात उद्या शिवसेनेकडून आम. वैभव नाईकांचे होणार जल्लोषी स्वागत

⚡मालवण ता.२५-: शिवसेनेत आमदारांच्या बंडामुळे उलथापालथ झाली असली तरी मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेशी आपली निष्ठा कायम ठेवत स्वाभिमान दाखविला आहे. म्हणूनच दि. २६ जून रोजी मालवणात येणाऱ्या आम. वैभव नाईक यांचे मालवण तालुका शिवसेनेतर्फे जोरदार जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण शिवसेना शाखा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना, बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे अनेक आमदार फुटले असताना आम्ही ज्यांच्यावर विश्वास टाकून निवडून दिले ते आम. वैभव नाईक शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत. आमचा विश्वास त्यानी सार्थ ठरविला आहे. म्हणूनच दि. २६ जून रोजी मालवणात दाखल होणाऱ्या आम. वैभव नाईक यांचे सकाळी १०. ३० वाजता भरड नाका ते शिवसेना शाखा असे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे, असे हरी खोबरेकर यांनी सांगितले.

आम. वैभवजी नाईक यांचे स्वागत करण्यासाठी, शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शविण्यासाठी आणि शिवसेनेचे बळ दाखवण्यासाठी मालवण शिवसेना शाखा येथे मालवण शहरातील व तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमूख, उपतालुका प्रमुख तालुका संघटक विभागप्रमुख शाखा प्रमुख शिवसेनेच्या अंगीकृत संघटना सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, महीला उपजिल्हा संघटक सौ.सेजल परब, महीला तालुकासमनवयक सौ.पूनम चव्हाण, महीला तालुकासंघटक सौ. श्वेता सावंत यांनी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page