नारायण धुरी यांच्याकडून दांडी शाळेतील मुलगी दत्तक

⚡मालवण ता.२५-: दांडी शाळेचे माजी विद्यार्थी तथा दांडी शाळा गौरव समिती अध्यक्ष श्री.नारायण धुरी यांनी आपला मुलगा कु.आदित्य याच्या सोळाव्या वाढदिवसानिमित्त दांडी शाळेतील एक मुलगी सा.फु.द.पा.योजने अंतर्गत दत्तक घेतली. यासाठी दांडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण यांच्याकडे ३ हजार रुपये कु.आदित्य याने सुपुर्द केले.

यावेळी दांडी शाळा पदवीधर शिक्षक शिवराज सावंत, सहाय्यक शिक्षिका सौ.मनिषा ठाकुर, तंत्रस्नेही शिक्षक रामदास तांबे उपस्थित होते. सदर रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ओरोस येथे कायम स्वरुपी ठेव ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी दांडी शाळेमध्ये १८ मुली दत्तक घेण्यात आल्या आहेत. १९ वी मुलगी दत्तक घेतल्या बद्दल नारायण धुरी यांचे दांडी शिक्षकवृंदांतर्फे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page