मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत आणि भेटवस्तू प्रदान कार्यक्रम संपन्न
⚡मालवण ता.१७-: मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे स्वागत आणि भेटवस्तू प्रदान कार्यक्रम प्रशालेच्या सभागृहात पार पडला.यावेळी संस्था सदस्य, ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री प्रकाश कुशे यांच्याकडून प्राप्त झालेल्या शैक्षणिक साहित्याचे , तसेच संस्थेकडून प्राप्त झालेल्या शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी समग्र शिक्षा योजनेअंतर्गत प्राप्त…
