⚡बांदा ता.१७-: बांदा येथील प्रसिद्ध उद्योजक प्रवीण श्रीकृष्ण शिरसाट यांनी बांदा येथील जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
बांद्यातील उद्योजक प्रवीण शिरसाट हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. आपली आई दीपलक्ष्मी श्रीकृष्ण शिरसाट यांच्या स्मरणार्थ त्यांनी चालू वर्षी बांदा शाळेतील १२ विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, माजी ग्रामपंचायत सदस्य उमांगी मयेकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, उपशिक्षक जे.डी.पाटील आदि उपस्थित होते.
यापूर्वीही प्रवीण शिरसाट यांनी शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे. शिरसाट कुटूबियांनी गरजू विद्यार्थ्यांना दिलेल्या या मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व पालकांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
