⚡मालवण ता.१७-: मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे स्वागत आणि भेटवस्तू प्रदान कार्यक्रम प्रशालेच्या सभागृहात पार पडला.
यावेळी संस्था सदस्य, ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री प्रकाश कुशे यांच्याकडून प्राप्त झालेल्या शैक्षणिक साहित्याचे , तसेच संस्थेकडून प्राप्त झालेल्या शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले.
सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी समग्र शिक्षा योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण देखिल करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन श्री. सुधीर हेरेकर , प्रमुख पाहुणे स्थानिक कमिटी सेक्रेटरी श्री. दशरथ कवटकर , संस्था सदस्य श्री.प्रकाश कुशे हे उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती प्रज्ञा कांबळी, शिक्षिका श्रीमती परुळेकर व श्रीमती तारी तसेच पालक शिक्षक संघ सदस्य श्री. सौदागर हे उपस्थित होते.
प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री भूपेश गोसावी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रशालेच्या शिक्षिका सौ. पूर्वी गोवेकर यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती कांबळी मॅडम, श्री. कवटकर तसेच श्री. कुशे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या तर अध्यक्षीय भाषणात श्री. सुधीर हेरेकर यांनी आपण सर्व विद्यार्थी भाग्यवान म्हणून या नावाजलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहात. विद्यार्थी सर्वांगाने विकसित व्हावा यासाठी ही प्रशाला अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. विद्यार्थी विकास हेच ध्येय असल्याने संस्थेचे सर्व प्रकारचे सहकार्य हे शाळेला आणि शिक्षकांना असते आणि यापुढेही असेल. एकाग्र चित्ताने अभ्यास करा शाळेचे आणि आपल्या पालकांचे नाव साता समुद्रा पार पोहोचवा’ असे सांगितले
शेवटी प्रशालेचे शिक्षक श्री. महेश लोकेगावकर यांनी आभार मानले.
