‘माझा सिंधुदुर्ग’चा शालेय शिष्यवृत्ती वितरण सोहळा संपन्न

⚡मालवण ता.१७-:
माझा सिंधुदुर्ग विकास संस्था (रजि.) व संलग्न माझा सिंधुदुर्ग ग्रुप आयोजित होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम नुकताच कुडाळ येथील मराठा समाज हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्गातील निराधार, अतीगरीब, प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या १२० शालेय विद्यार्थ्यांना वर्षाला लागणाऱ्या संपूर्ण शैक्षणिक साहित्य शिष्यवृत्तीच्या माध्यमातुन वितरित करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन या कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, पत्रकार शेखर सामंत, क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, जैतापकर बिल्डर्सचे संचालक अभिजित जैतापकर, ज्येष्ठ शिक्षक अविनाश लावलकर, मराठा समाज हॉलचे महेंद्र गवस, माझा सिंधुदुर्ग संस्थापक व अध्यक्ष विकास पालव तसेच माझा सिंधुदुर्गचे सर्व सभासद, पदाधिकारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझा सिंधुदुर्ग विकास संस्थेचे सल्लागार प्रल्हाद भाटकर यांनी केले. रामचंद्र आंगणे व शेखर सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास पालव यांनी सिंधुदुर्गातील उद्योजक, समाजप्रेमी दानशूर व्यक्तींना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच सर्व देणगीदारांचे तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व सभासदांचे कौतुक केले. यावेळी इतर मान्यवरांनीही विचार मांडत या शिष्यवृत्ती उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थानी आपल्या कला सादर केल्या. त्यानंतर जिल्ह्यातून निवडलेल्या १२० हुशार होतकरू विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास पेटी, परीक्षा पॅड, पेन पेन्सील सेट, कलर बॉक्स, बॉटर बॉटल इत्यादी शालेय साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. तर संस्थेच्या महिला प्रतिनिधी सौ. तेजल नागवेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी मराठा समाज हॉल यांचे तसेच शिष्यवृत्ती उपक्रम यशस्वी होण्यासाठी माझा सिंधुदुर्गचे संदीप साईल, सुधीर गावडे, प्रशांत दुखंडे, पांडुरंग पालव, योगी चव्हाण, परेश आचरेकर, आबा भोजणे, तेजल नागवेकर यांनी विशेष मेहनत घेतली तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीं अरिन टिकम, स्वप्नील पालव, गणेश पवार, अमित कांदळगावकर, अभिजीत केरवडेकर, नितीन नाईक, संदेश कडुलकर, अमोल मसुरकर, चंद्रशेखर सावंत, संदेश कावले, गोविंद पालव, स्वप्नील कुबल, अशोक पाटील, तृप्ती आचरेकर, ज्योती सावंत, सिया साईल, नंदिनी देसाई, सागर राणे , वसंत परब, सुरेश सावंत, रेणुका राऊळ, हेमंत मोंडकर, अनिल पाटील, ओमकार पालव, मंदार नारकर, विशाल वालावलकर, शिवराम गायचोर, गणेश पाडगावकर, मानसी सावंत, सचिन शिंदे यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page