मार्च २०१८ मध्ये पिंगुळी येथे घडली होती घटना;दोघांना प्रत्येकी एक लाखाचा दंड
ओरोस ता १७
विनायक गणपत मुंडये (वय ६४), उत्तम गणपत मुंडये (वय ५८) दोन्ही राहणार पिंगुळी गोंधळपुर यांना महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सात वर्षाचा सश्रम कारावास आणि दोघांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास अधिक एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश एस डी चव्हाण यांनी हा निकाल दिला असून सरकारी वकील नितीन कुंटे यांनी याप्रकरणी काम पाहिले.
