Headlines

स्कॉलरशिप परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश

⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ -: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित स्कॉलरशिप परीक्षा-२०२२-२३ परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्यावतीने घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे- पूर्व माध्यमिक स्कॉलरशिप इयत्ता आठवी) स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी- कुमारी निधी चंद्रकांत राऊळ,…

Read More

मालवणात भाजपच्या माध्यमातून ५० सफाई कामगाराना पावसाळी रेनकोट वाटप…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्य: माजी खासदार निलेश राणे यांचा पुढाकार.. ⚡मालवण ता.२४-: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिनाचे औचित्य साधून भाजपा मालवणच्यावतीने मालवण कुडाळ विधानसभा संयोजक आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या सहयोगाने मालवण शहरातील ५० सफाई कामगाराना पावसाळ्यासाठी आवश्यक असणारा रेनकोट वाटप करण्यात आले….

Read More

मणेरी शाळेचे छप्पर अंशत: कोसळले

⚡दोडामार्ग,ता.२४-:मणेरी शाळा क्रमांक एकचे छप्पर सोमवारी दुपारी मुसळधार पावसामुळे अंशत: कोसळले. इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थी संगणक कक्षात गेले होते.त्याचवेळी छपराचा मोठा वासा वर्गात कोसळला.त्यासोबत काही कौलेही पडली.सुदैवाने त्यावेळी विद्यार्थी वर्गात नव्हते अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.त्यानंतर तत्काळ शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून बैठक घेतली.शाळेचे संपूर्ण छप्परच धोकादायक झाले आहे.कौले फुटून पाणी गळते आहे.छपराचे लाकूड…

Read More

ग्रामपंचायत आणि सरपंच’ मासिकाच्या संपादकपदी प्रवीण गवस

सिंधुदुर्ग आवृत्तीच्या प्रकाशन,वितरण आणि व्यवस्थापनाची जबाबादारी ⚡दोडामार्ग,ता.२४-:ग्रामपंचायत आणि सरपंच या राज्यस्तरीय मासिकाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपादक पदी स्वराज सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण नारायण गवस ( तेरवण मेढे ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्यावर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आवृत्तीच्या प्रकाशन,वितरण आणि व्यवस्थापनाची जबाबदारी श्री.गवस यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ग्रामपंचायत आणि सरपंच मासिकाचे मालक, संपादक आणि प्रकाशक सूर्यभान जायभाये…

Read More

दोडामार्गात सहाव्या दिवशीही जोरदार पाऊस

⚡दोडामार्ग,ता.२४-: तालुक्यात सोमवारी सहाव्या दिवशीही जोरदार पाऊस पडत आहे.सोसाट्याच्या वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे रस्त्यात ठिकठिकाणी झाडे पडून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.शिवाय अनेक गावातील वीज अनेक दिवसांपासून गायब आहे.साटेली भेडशी परिसरात सुद्धा विजेचा लपंडाव सुरू आहे.त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मुसळधार पावसामुळे रविवारी मणेरी – वानोशी – साटेली भेडशी या मार्गावरील वानोशी…

Read More

लोरे येथील मंदिर परिसरात केले वृक्षारोपण

माजी सभापती मनोज रावराणे आणि लोरे सरपंच अजय रावराणे यांचा पुढाकार ⚡कणकवली ता.२४-:लोरे नं. १ ग्रामपंचायतच्यावतीने श्री देव गांगोचाळा देवालय मंदिर परिसरात विविध अशा २०० झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण माजी सभापती मनोज रावराणे आणि लोरे सरपंच अजय रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री देव गांगोचाळा देवालय मंदिर परिसरात पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात आले आहे….

Read More

मायादेवी चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लबतर्फे मायादेवी रावराणे स्मृतिदिन

⚡कणकवली ता.२४-: आदर्श शिक्षिका आणि समाजसेविका मायादेवी विश्राम रावराणे यांचा २१ वा स्मृतीदिन असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात सामाजिक बांधिलकीतून नुुकताच संपन्न झाला. यावेळी कै.मायादेवी रावराणे यांचे सुपुत्र आणि चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र रावराणे, ॲड.अजित भणगे, निवृत्त गटशिक्षणाधिकारी मोहनराव सावंत, रोटरी क्लब ऑफ कणकवलीचे अध्यक्ष रो.शंकर तथा रवि परब, रो.डाॅ.विद्याधर तायशेटे, डाॅ.प्रदीप साटम, डाॅ.विक्रांत रावराणे, राजश्री…

Read More

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलतर्फे व्हीलचेअर प्रदान

⚡कणकवली ता.२४-: रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या सदस्यानी कणकवली येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हुंबरठ -घोरपीवाडी या दुर्गमवाडीमध्ये जाऊन तेथील रमेश होळकर यांना त्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी व्हीलचेअर प्रदान करण्यात आली.रोटरीयन अनिल करपे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी ही व्हीलचेअर अपंग व्यक्तीस प्रदान केली. या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दात सांगता येणार नाही. रोटरीतर्फे या कुटुंबाला गुलाबपुष्प,…

Read More

कुडाळ पंचायत समिती साजरी करणार ‘ चिखलधुनी ‘ महोत्सव…

२६ रोजी अणाव हुमरमळा येथे आयोजन:प्रशासक विजय चव्हाण यांची माहिती ⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मान्सून महोत्सव अंतर्गत ‘चिखलधुणी’ हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बुधवारी, २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता अणाव-हुमरमळा येथे राबविण्यात येणार आहे.या ठिकाणी दोन कोपऱ्यामध्ये जोत बांधून पारंपरिक शेती व दुसरी आधुनिक पद्धतीची शेती लागवड केली जाईल. नवीन पिढी…

Read More

नाहरक दाखला द्या अन्यथा जनआक्रोश…

अनंत उचगावकर; पालिकाप्रशासनाकडून चालढकलपणा.. सावंतवाडी ता.२४-:येथील नेत्र रुग्णालयाच्या पार्ट परमिशन साठी लागणारा ना हरकत दाखला येत्या दोन दिवसात द्या अन्यथा प्रशासनाच्या विरोधात २८ जुलै रोजी अधबांधव व कर्मचाऱ्यांना घेऊन जनआक्रोश आंदोलन छेडू असा इशारा नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना निवेदनिव्दारे दिला. श्री उचगावकर यांनी यासंदर्भात पालिकेला दिलेले निवेदन प्रसिद्धीस दिले आहे,…

Read More
You cannot copy content of this page