कोनाळमधील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामपंचायत आणि कोकण विकास संस्थेच्या वतीने शिबिराचे आयोजन

⚡दोडामार्ग ता.०२-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत कोनाळ यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या तपासण्या करून औषध वाटप करण्यात आले. उद्घाटनावेळी कोनाळ सरपंच अस्मिता गवस, उपसरपंच रत्नकांत कर्पे, सदस्य सुधाकर बांदेकर, सदस्य संजीवनी शिरवलकर, ग्रामसेवक जनार्दन खानोलकर, एम.आर नाईक विद्यालयाचे शिक्षक उमेश सावंत, जि.प.शाळा मुख्याध्यापिका स्नेहल सावंत, शिक्षक श्री गवस, श्रीम.पाडगांवकर, कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत उपस्थित होते.
दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोकण संस्थेच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्री. खानोलकर यांनी १५ व्या वित्त आयोग आराखड्याच्या माध्यमातून विविध प्रशिक्षणे, आरोग्य शिबिर, बचत गटांना व्यवसाय मार्गदर्शन असे अनेक उपक्रम राबविल्याची माहिती दिली. त्यात आरोग्य शिबिरासारख्या बाबींचा समावेश ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आलेला आहे.
या आरोग्य शिबिरासाठी पडवेतील एसएसपीएम हॉस्पिटलच्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. यामध्ये डॉ.सानिया खान, स्त्रीरोग तज्ञ डॉ. वीरेंद्रकुमार सुतार, नेत्ररोग तज्ञ डॉ. संजय जोशी, दंत चिकित्स्क डॉ.निधी जोशी, बालरोगतज्ञ डॉ. प्रियंका सावंत-म्हाडदळकर, आयुर्वेदिक डॉ. श्रीया मठकर, फिजिओथेरपिस्ट हिमांशू शिरसाट, लॅब टेक्निशियन नीलम देसाई,जनसंपर्क अधिकारी विकास लुडबे, विष्णू गोसावी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
श्री.सावंत यांनी कोकण विकास संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. सरपंच अस्मिता गवस यांनी मनोगत मांडले.
यावेळी प्रकल्प समन्वयक हनुमंत गवस, कार्यक्रम समन्वयक समीर शिर्के, अवंती गवस, प्रदीप पवार, भावना साटम, कुणाल चव्हाण,प्रसन्ना पांगम आदी उपस्थित होते. या शिबिर यशस्वी होण्यासाठी कोकण विकास संस्था ,ग्रामपंचायत कोनाळ व एम आर नाईक विद्यालयाचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page