⚡कुडाळ ता.०२-:
कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसकडून जालना येथे न्याय हक्कांसाठी उपोषणकर्त्या मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज घटनेचा आज कुडाळ गांधी चौक येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिंदे – फडणवीस- पवार महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, अल्पसंख्याक कुडाळ तालुका अध्यक्ष तबरेज शेख, मंदार शिरसाट, उल्हास शिरसाट, तोसिफ शेख, रोहन काणेकर, वैभव आजगावकर, अनंत खटावकर आदी उपस्थित.
