सानिका चिंदरकर यांना दोन लाखांचा धनादेश प्रदान…

प्रधानमंत्री विमा अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने दिली रक्कम..

वेंगुर्ले ता.०२-:

प्रधानमंत्री विमा योजनेंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेंगुर्ले शाखेकडून श्रीमती सानिका संतोष चिंदरकर यांना दोन लाखाचा धनादेश शाखाधिकारी राजेंद्र वेळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


वेंगुर्ला परबवाडा येथील संतोष गणपत चिंदरकर यांच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेंगुर्ले शाखेमध्ये असलेल्या बँक खात्यामधून प्रधानमंत्री विमा योजनेचे वार्षिक 436 रुपये जमा केले जात होते. त्यामुळे संतोष चिंदरकर यांच्या मृत्यूनंतर या योजनेतून मिळालेल्या दोन लाख रुपये रकमेचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला यावेळी उपशाखा अधिकारी यश दीक्षित, सुहास गोसावी आदी बँक कर्मचारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्राच्या वेंगुर्ले शाखेच्या वतीने देण्यात आलेला हा पहिलाच दावा असून हा दावा 15 दिवसात मंजूर करून खऱ्या अर्थाने लाभार्थ्याला लाभ मिळवून दिला असल्याने लाभार्थी सानिका चिंदरकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page