⚡बांदा ता.०२-: श्री दत्त पद्मनाभ पिठाच्या अखंडित सद्गुरु परंपरेतले ईश्वरी ज्ञानोपदेशक सद्गुरू सदानंदाचार्य स्वामीजींची पुण्यतिथी महोत्सव श्री क्षेत्र परंधाम मठ, गुळदुवे येथे रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी विठाधीश्वर पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या उपस्थितीत होणार आहे.
यावेळी सकाळी पूज्य सद्गुरु समाधी स्थळावर महापूजा, सद्गुरू चरित्र वाचन, सद्गुरु भक्ती महायज्ञ ,काशी विश्वेश्वर स्थळावर रुद्राभिषेक तसेच, गुळदूवे पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा पारंपारिक पार होणार आहे. त्यानंतर प्रकट कार्यावेळी पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे आशीर्वाद होणार आहे सायंकाळी चार वाजता भजन पालखी, उत्सव सद्गुरूंचे आशीर्वचन होणार आहे.
यावेळी गुरु माता ब्राह्मी देवी, श्रीदत्त पद्मनाभ पीठ संचालक मंडळ कृपाकांक्षी तसेच विविध स्तरातील व्यक्ती भक्त गण उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन परमपूज्य पद्मनाभ शिष्य संप्रदाय व श्री दत्त पद्मनाम पिठान केला आहे.
