दोडामार्गात उद्या मॅरेथॉन स्पर्धा…

शिवसेनेतर्फे आयोजन;शिक्षणमंत्री केसरकर, ब्रिगेडियर सावंत उपस्थित राहणार..

⚡दोडामार्ग ता.०२-:
तालुका शिवसेनेच्या वतीने रविवारी (ता.३)वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धा सकाळी ९ वाजता दोडामार्ग पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ येथून सुरु होणार आहे.


स्पर्धेचे उदघाट्न शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होईल.यावेळी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत तालुक्यातील युवक ,युवती, लहान मुले,मुली, प्रौढ व्यक्तींनीही सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख गणेशप्रसाद यांनी केले आहे.

You cannot copy content of this page