Headlines

आंबोली घाटातील धबधब्याना सिनेमाची नावे देण्यास ग्रामस्थांचा विरोध…

थोड्याच वेळात होणार केसरकर यांच्या हस्ते उदघाटन ⚡आंबोली, ता.१२-: आंबोली घाटातील धबधब्याना सिनेमातील नावे देण्याचा वात्रटपणा करू नका आंबोलीतून याबाबत रोष व्यक्त करण्यात येत असून तेथे होणाऱ्या उदघाटन वेळी मंत्री दीपक केसरकर याना देखील हे सांगण्यात येणार आहे. आंबोली घाट म्हणून प्रसिद्ध आहे. या घाटात अनेक धबधबे आहेत.जवळपास ६ धबधबे मोठे आहेत तर आणखी असंख्य…

Read More

परशुराम उपरकरांना शहरातील व्यापाऱ्यांच्या समस्या काय समजणार…?

अण्णा कोदे यांचा सवाल: कापड विक्रेत्यांच्या मागणीलानितेश राणेंनी न्याय दिला… ⚡कणकवली ता.१२-: कणकवली शहरात 17 मतांचा ब्रँड असलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांचे कणकवली शहरासाठी योगदान काय? असा सवाल भाजपा कणकवली शहराध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे यांनी केला आहे. अण्णा कोदे म्हणाले,आमचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे…

Read More

तलाठी परीक्षेचा सावळा गोंधळ…

सिंधुदुर्गात ३ मंत्री पण एकाचाही जिल्ह्याला काडीचाही उपयोग नाही;तलाठी परीक्षा केंद्रच सिंधुदुर्गात नाही हे जिल्ह्यातील मंत्र्यांच यश;योगेश धुरी.. ⚡कुडाळ ता.१२-: हे सरकारच आमचे नाही, हे सरकार गुजराती लोकांचे भले करण्यासाठी आहे. तलाठी परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्हयात परीक्षा केंद्रच नाही, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंत्र्यांचे यश म्हणावे लागेल, अशी उपरोधिक टीका कुडाळ तालुका युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे २०० वृक्षांची लागवड

⚡वेंगुर्ला ता.१२-: आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या शुरविरांचा सन्मान व्हावा या हेतूने ‘मिट्टी को नमन, वीरों को वंदन‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज वृक्षदिडी काढून सुमारे २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. सकाळी ८…

Read More

गोपिका भोगणे यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.१२-: माजगाव हरसावंतवाडा दत्त मंदिर जवळील रहिवासी गोपिका राघोबा भोगणे वय 103 यांचे शुक्रवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. माजगाव ग्रामपंचायती चे माजी सरपंच व माजगाव येथील आदर्श ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संचालक दत्तगुरु भोगणे यांची ती आई होत. तसेच सावंतवाडीच्या माजी नगरसेविका शिप्रा…

Read More

उपक्रमातून दशावताराच्या भविष्याची नांदी-डॉ.सुदिश सावंत

⚡वेंगुर्ला ता.१२-: दशावतार क्षेत्रातील एका संस्थेकडून केला जाणारा रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम म्हणजे दशावताराच्या भविष्याची नांदी असल्याचे उद्गार मठ येथील डॉ.सुदिश सावंत यांनी उद्घाटनप्रसंगी काढले. श्री दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने सुरु असलेल्या ‘प्रवास दत्तमाऊलीचा सोहळा त्रै वर्षे पूर्तीचा‘ या उपक्रमांतर्गत स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे भव्य रक्तदान व…

Read More

सावंतवाडी तालुका युवा काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी गजानन टक्कर…

⚡सावंतवाडी ता.१२-: तालुका युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी गजानन टक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांना नुकतेच काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे.ही निवड तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या शिफारिशानुसार करण्यात आली आहे.

Read More

आर पी डी हायस्कूल येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच विकास सावंत यांच्या हस्ते शुभारंभ

⚡सावंतवाडी ता.१२-: स्व. भाईसाहेब सावंत जनशताब्दी वर्षानिमित्त आरपीडी हायस्कूलमध्ये आज जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.यावेळी यावेळी मुख्याध्यापक शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते.

Read More

अखेर नवीन कुर्ली ग्रामपंचायत निर्मितीचा शासकीय आदेश जारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, ग्रामविकास मंत्री महाजन यांनी दिला न्याय; संजय आग्रे.. कणकवली 12 ऑगस्ट (प्रतिनिधी)- देवघर धरणग्रस्त ग्रामस्थांच्या नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीचा शासकीय अध्यादेश जारी करण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नवीन कुर्ली वसाहत मधील ग्रामस्थांची 20 वर्षांहून अधिक वर्षांची मागणी पूर्ण केली असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख…

Read More

कणकवली तालुक्यामध्ये डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ

प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू;विशेष ताप रुग्ण सर्व्हेक्षण कणकवली 12 ऑगस्ट (प्रतिनिधी)- कणकवली तालुक्यामध्ये डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ होत असून आजपर्यंत विविध गावांतील मिळून जवळपास १४० सिरम सॅम्पल घेऊन त्यांची डेंग्यू तपासणी करणेत आली असून यामध्ये शिरवल-४, दारिस्ते – २, हळवल – १, सांगवे – १, बावशी- १, नागवे – १, बिडवाडी- १, कलमठ- १, सातरल- १,…

Read More
You cannot copy content of this page