Headlines

मदर तेरेसा स्कूलच्या साक्षीची व्हॉलीबॉल राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…

⚡वेंगुर्ले ता.३०-: एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट येथे झालेल्या विभाग स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मदर तेरेसा स्कूलच्या इयत्ता दहावी शिकणाऱ्या कुमारी साक्षी सतीश शेट्टी हिने निवड चाचणी मध्ये सहभाग घेतला होता या तिने उत्कृष्ट कामगिरी केली त्यामुळे तिची पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धा पालघर येथे 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबरला होणार आहेत.साक्षीला राज्यस्तरावर पोहचवण्यासाठी प्रशालेचे क्रिडाशिक्षक श्री संदेश रेडकर व राष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडू राधाकृष्ण पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशलेचे मुख्याध्यापक फादर फेलिक्स लोबो व वेंगुर्ला चर्च चे फादर फ्रान्सिस डिसोझा यांनी प्रोत्साहन दिले.प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page