सालईवाडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव समोर हायस्कूलच्या संगीत मंचाचा उपक्रम
⚡सावंतवाडी ता.३०-: मिलाग्रिस हायस्कूल चे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या संकल्पनेतून मिलाग्रिस हायस्कूल च्या संगीत मंचाने सावंतवाडी सालईवाडा येथील सार्वजनिक गणेश मंडळांने प्रतिष्ठापना केलेल्या गणेश मूर्तीसमोर गणेश वंदना सादर केली.या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, संगीत शिक्षक श्री अमोल राऊळ,श्री स्वप्नील गोरे व शिक्षक श्री दत्ताराम नाईक उपस्थित होते.
