मोती तलावात पडलेल्याचा मृतदेह सापडला….

पोलीस, प्रशासनाला आले कळविण्यात:बाहेर काढल्यावर नातेवाइकांचा घेणार शोध

⚡सावंतवाडी ता.३०-: येथील मोती तलावात काल रात्री अनोळखी व्यक्ती पडल्याची घटना घडली होती. दरम्यान यावेळी नगरपालिका व पोलिसांनी त्याचा शोध घेतला होता. मात्र तो न सापडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती.

दरम्यान आज सकाळी काही नागरिकांना एक मृतदेह मोती तलावात तरंगताना आढळून आला असता माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी पोलिसांना व नगरपालिका प्रशासनाला याबाबत माहिती दिली. पाचारण करत सदरचा मृत्यूदेह दिसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान हा मृतदेह आता बाहेर काढल्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पोस्टमार्टम करून ओळख पटल्यावर नातेवाईकांच्या शोध घेणार आहे.

You cannot copy content of this page