⚡वैभववाडी ता.२९-: उंबर्डे धनगरवाडा येथील रामचंद्र जानू काळे वय (५१) यांचे हदयविकाराच्या झटक्याने मुंबईत (चेंबूर) येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उंबर्डे अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेत असताना त्यांनी रस्त्यातच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनामुळे उंबर्डे गावात हळहळ व्यक्त होत आहे. यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन मुलगी, भाऊ, तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. कासार्डै माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक धनगर समाज उन्नती मंडळ जिल्हाध्यक्ष पांडुरंग काळे यांचे ते ज्येष्ठ बंधू तर कोकिस्से माध्यमिक विद्यालय शिक्षिका पल्लवी काळे यांचे ते दीर होते.
